कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात आज, सोमवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या मुखकमलावर आली एक मिनीटभर चेहऱ्यावर स्थिरावून किरिटावर जाऊन लुप्त झाली. अशा रीतीने या वर्षीचा अंबाबाईचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला.अंबाबाईच्या किरणोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी किरणे खांद्यापर्यंत, दुसऱ्या दिवशी कानापर्यंत आली होती. तिसऱ्या दिवशी आज, सोमवारी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर आली, अगदी किरिटापर्यंत लुप्त झाली. पूर्ण क्षमतेने होत असलेला किरणोत्सवाचा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. देवीची आरती होताच, भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला.यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा.मिलिंद कारंजकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/4113866522211863/}}}}
Web Summary : Kolhapur witnessed a complete Kirnotsav at Ambabai Temple. Sun rays touched the idol's face and crown. Devotees rejoiced as the divine spectacle unfolded, chanting 'Amba Mata ki Jai'.
Web Summary : कोल्हापुर में अंबाबाई मंदिर में पूर्ण किरणोत्सव हुआ। सूर्य की किरणें मूर्ति के चेहरे और मुकुट को स्पर्श करती हैं। भक्तों ने 'अंबा माता की जय' का जाप करते हुए दिव्य दृश्य का आनंद लिया।