अंबाबाईचा आज रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:46+5:302021-04-27T04:23:46+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा आज मंगळवारी रथोत्सव होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हा सोहळा मंदिरात ...

अंबाबाईचा आज रथोत्सव
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा आज मंगळवारी रथोत्सव होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हा सोहळा मंदिरात होणार असून त्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव होतो. सजवलेल्या चांदीच्या रथात अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान होते. महाद्वारातून या उत्सवाला सुरुवात होते. पुढे महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिर, मार्गे पुन्हा महाद्वारात येऊन हा सोहळा पूर्ण होतो. यानिमित्त भाविक मार्गावर सुरेख रांगोळ्या रेखाटतात. फुलांचा गालिचा तयार केला जातो. ठिकठिकाणी भाविकांना प्रसाद वाटप केले जाते. गतवर्षीपासून मात्र कोरोनाचा कहर सुरू असल्याने हा सोहळा प्रतिकात्मकरित्या मंदिराच्या आवारातच साजरा केला जाणार आहे. रात्री साडेनऊ वाजता तोफेच्या सलामी नंतर काही पावलं रथ चालवत नेला जाईल त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा करून हा साहेळा पूर्ण केला जाईल. यावेळी केवळ देवस्थान समितीचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी व मानकरी उपस्थित असतील.
--
रथाच्या तयारीचा फोटो स्वतंत्र येईल.
--