अंबाबाई विकास आराखडा शासनास पाठविणार
By Admin | Updated: April 11, 2015 00:09 IST2015-04-11T00:03:31+5:302015-04-11T00:09:58+5:30
मंदिर परिसर विकासाचा २५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार

अंबाबाई विकास आराखडा शासनास पाठविणार
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास प्रकल्पाचा नव्याने केलेला २५५ कोटींचा प्रारूप आराखडा २० एप्रिलला होणाऱ्या महापालिकेच्या मंजुरीनंतर राज्य शासनास सादर केला जाणार आहे. याशिवाय सभेत झोन बदल, राजाराम कारखाना जागेवर बगीचा आरक्षण आदी विषयांवर चर्चा होणार आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास २५५कोटी रुपये खर्चून तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि बाह्ण परिसराच्या विकास केला जाणार आहे, ज्यात मंदिराच्या वास्तूचे जतन, संवर्धन, दर्शनमंडप, मंदिर बाह्ण ३० ते ४० मीटर परिसरातील भूसंपादन व नागरिकांचे पूनर्वसन, भक्तनिवास, प्रसादालय, पार्किंगचा समावेश असेल. आराखड्याचा दुसरा टप्पा धार्मिक स्थळांचे विशेषत: कोल्हापुरातील नवदुर्गा मंदिरांचा विकास, रंकाळा, पंचगंगा घाट, मंदिराशी जोडणारे रस्ते यावर आधारित आहे. हा प्रारूप आराखडा महासभेच्या मंजुरीने राज्य शासनास पाठविला जाणार आहे.प्राथमिक शाळेचे आरक्षण असलेल्या रि.स.नं. १७५/१अ पैकी ८७६ चौरस मीटर जागा खरेदी सूचना देणे, ‘राजाराम’च्या जागेवर बगीचा आरक्षण टाकणे,रि.स.नं. ५४६ येथील खुली जागा हिरव्या पट्ट्यातून रहिवाशी जागेत बदल करणे, स्टर्लिंग टॉवर ते बागल चौकपर्यंत १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करणे, आदी विषय सभेपुढे चर्चेसाठी येत आहेत. (प्रतिनिधी)
मंदिर परिसर विकासाचा २५५ कोटींचा प्रारूप आराखडा तयार
२० एप्रिलच्या मनपाच्या सभेत होणार मंजूर
झोन बदलासह राजाराम कारखान्याचा विषय पुन्हा चर्चेसाठी
५महापौर माळवी यांच्या विरोधात सभागृहात बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामध्ये शिथीलता आणत, अर्थसंकल्प व माळवी यांच्या विरोधातील ठरावासाठी बोलावलेल्या सभेला नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता २० एप्रिलला होणाऱ्या सभेला सत्ताधारी उपस्थित राहणार की पुन्हा बहिष्कार टाकणार, याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे.
माळवी यांनी अद्याप अर्थसंकल्प मंजुरी व त्यांच्या विरोधातील ठरावावर स्वाक्षरी केलेली नाही. येत्या २० एप्रिलच्या सभेपूर्वी त्यांची स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. माळवी या ठरावावर १७ एप्रिलच्या दरम्यान स्वाक्षरी करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.