कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला गेल्या आठ महिन्यात १२ कोटी ६ लाख ४६ हजार ३८९ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ही आकडेवारी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंतची असून त्यात सर्व देवताकृत्ये, साडी देणगी, ऑनलाईन देणगी अशा वेगवेगळ्या पद्धतीतून आलेल्या रकमेचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक ६ कोटींची रक्कम दानपेटीतून आली आहे.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराला वर्षभरात ६० लाखांहून अधिक भाविक भेट देतात. आठवड्यातील शुक्रवार, शनिवार रविवार हे तीन दिवस, नवरात्रौत्सव, उन्हाळ्यातील सुट्ट्या, दिवाळी, ख्रिसमस या सुट्ट्यांच्या दिवसात तर ही आकडेवारी दिवसाला दीड लाख ते अडीच लाखांपर्यंत जात आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नातही घसघशीत वाढ झाली आहे.मंदिराला सर्वाधिक उत्पन्न दानपेट्यांतून मिळते. आठ महिन्यात ही रक्कम ६ कोटी ७१ लाखांवर गेली आहे. त्या पाठोपाठ पावतीने आलेली देणगी, क्युआर कोडने आलेली देणगी, अंबाबाईचा अभिषेक, कुंकुमार्चनसह वेगवेगळे देवताकृत्ये, साडी विक्री अशा विविध प्रकारच्या देणगीतून हे उत्पन्न मिळाले आहे.
देणगीचा प्रकार : रक्कमदानपेटी : ६ कोटी ७१ लाख ११ हजार ६५०देणगी : १ काेटी २९ लाख ७४ हजार ४९०क्युआर देणगी : ६८ लाख ८७ हजार ८००देवताकृत्य : ६६ लाख २ हजार ९९६देणगी (यूपीआय) : ४८ लाख ५६देवताकृत्य (ऑनलाईन) : ४२ लाख ६५ हजार ३१७साडी देणगी : ४२ लाख ३० हजार ७१९ऑनलाईन देणगी : ४१ लाख ९४ हजार २१९अन्नदान देणगी : ४० लाख ३६ हजार ५१९साडी देणगी (यूपीआय) : ३२ लाख १३ हजार ६१५अन्नदान देणगी (यूपीआय) : २३ लाख २९ हजार ००८एकूण : १२ कोटी ६ लाख ४६ हजार ३८९
Web Summary : The Ambabai Temple in Kolhapur received ₹12.06 crore in eight months, primarily through donations. The temple attracts over 60 lakh devotees annually, with peak seasons boosting revenue. Box donations were highest, totaling ₹6.71 crore, followed by other forms of giving.
Web Summary : कोल्हापुर के अंबाबाई मंदिर को आठ महीनों में ₹12.06 करोड़ का दान मिला, मुख्य रूप से दान के माध्यम से। मंदिर में सालाना 60 लाख से अधिक भक्त आते हैं, जिससे राजस्व में वृद्धि होती है। दानपेटी दान ₹6.71 करोड़ के साथ सबसे अधिक था।