शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:44 IST

Mahalaxmi Temple Kolhapur news- करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे शनिवारी लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे. ज्या परिसरासाठी सूचना द्यायची आहे, त्या ठिकाणीच आवाज ऐकू येणार असल्याने मंदिराचे मांगल्य-पावित्र्य, शांतता जपली जाणार आहे.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वितखासदार संभाजीराजे यांच्या हस्ते लोकार्पण : दिनदर्शिकेचेही प्रकाशन

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दीड कोटींची अत्याधुनिक ध्वनियंत्रणा कार्यान्वित झाली आहे. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या यंत्रणेचे शनिवारी लोकार्पण झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या यंत्रणेमुळे आवाज अधिक सुस्पष्ट आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह येणार आहे. ज्या परिसरासाठी सूचना द्यायची आहे, त्या ठिकाणीच आवाज ऐकू येणार असल्याने मंदिराचे मांगल्य-पावित्र्य, शांतता जपली जाणार आहे.खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून दीड वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने हा निधी अंबाबाई मंदिरासाठी दिला होता. मंदिरातील गरुड मंडपात झालेल्या सोहळ्यात या यंत्रणेचे लोकार्पण तसेच देवस्थान समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते.यावेळी यंत्रणेचे काम केलेल्या कॉमटेक टेलीसोल्युशन कंपनीचे संचालक नवीन हालगेकर, प्रोजेक्ट मॅनेजर एडवर्ड डिसुझा, कन्सलटंट शेखर निरगुडकर, अमरजा निंबाळकर, राहुल जगताप व अभिजित पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विजय पोवार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूर