अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:22 IST2021-04-06T04:22:08+5:302021-04-06T04:22:08+5:30

राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली असून त्यात सर्व जाती-धर्माची मंदिरे ...

Ambabai temple closed again, Jyotiba Yatra canceled | अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द

अंबाबाई मंदिर पुन्हा बंद, जोतिबा यात्रा रद्द

राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली असून त्यात सर्व जाती-धर्माची मंदिरे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, देवस्थान समितीकडे तसे निर्देश आलेेले नसल्याने सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले होते.

सोमवारी दुपारी बैठकीनंतर त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार अंबाबाईसह समितीच्या अखत्यारितील सर्व ३ हजार ६४ मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले तसेच यंदाही २६ तारखेला होणारी जोतिबाची चैत्र यात्राही करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी (दि. २७) अंबाबाईचा रथोत्सवदेखील प्रतीकात्मकरित्या मंदिराच्या आवारात साजरा केला जाईल. सर्व मंदिरांचे सर्व धार्मिक विधी, पूजा, अर्चा नियमित सुरू राहतील. मात्र, पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, सुरक्षा रक्षकवगळता अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

--

अंबाबाई व जोतिबाचा फोटो वापरावा

--

मंदिर बंदचा फोटो स्वतंत्र

--

Web Title: Ambabai temple closed again, Jyotiba Yatra canceled