शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईचा भक्तिमय कुंकूमार्चन सोहळा, अंबा माता की जयचा अखंड गजर अन् मंत्रोच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:48 IST

हा सोहळा देवीची मूर्तीची तिच्या मूळ जागी पुनर्प्रतिष्ठापना होऊन ३०९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आला

कोल्हापूर : सकाळच्या प्रफुल्लीत प्रसन्न वातावरणात अंबा माता की जयचा अखंड गजर अन् मंत्रोच्चारात अंबाबाई मंदिराच्या पवित्र परिसरात रविवारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित सौभाग्यदायी व सौख्यदायी अंबाबाई कुंकूमार्चन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास पाच हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे भवानी मंडप अक्षरश: ओसंडून वाहत होता.हा सोहळा देवीची मूर्तीची तिच्या मूळ जागी पुनर्प्रतिष्ठापना होऊन ३०९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आला. सर्वसामान्य महिलांना धार्मिक विधीवतरित्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने अंबाबाईच्या उपासनेचे समाधान मिळावे. या उद्देशाने भवानी मंडपात मोठा मांडव व व्यासपीठ उभारण्यात आले होते. मध्यभागी आई अंबाबाईच्या प्रतिकृतीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. भोवतीने फुला- पानांची मनमोहक आरास होती. भक्तीमय वातावरणाने भारलेल्या या वातावरणात सकाळी साडे सात वाजता वेदमूर्ती करवीर क्षेत्रोपाध्याय सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कुंकूमार्चन उपासना पार पाडण्यात आली. कोल्हापूर ब्राम्हण पुरोहित संघाने मंत्रोच्चार केले. या सोहळ्यात महिला गुलाबी रंगाची साडी, केसात गजरा आणि पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. भवानी मंडपासह सर्व परिसर महिलांच्या गर्दीने भरून गेला होता. कोल्हापूरसह पुणे, मुंबई, गोवा, कोकण, कर्नाटकासह कारवार आदी भागातील महिलांनी या सहभाग घेतला. या सोहळ्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी, राजेश सुगंधी, विराज कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, सुनील जोशी, संजय जोशी, आदित्य मेवेकरी, रणजित सुगंधी, प्रशांत तहसीलदार, अंकित भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.

या उपासना सोहळ्यानंतर महिलांमध्ये लकी ड्राॅ काढण्यात आला. यातील विजेत्या महिलांना एक आटाचक्की, पाच वाॅटर प्युरिफायर, पाच ऑलिव्हीया गिफ्ट, पंचवीस पैठणी साड्या अशी बक्षिसे दिली गेली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर