शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई विकास आराखडा १२०० कोटींचा, प्रस्ताव शासनाला सादर; तीन वर्षाचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 18:05 IST

शिखर समितीच्या बैठकीत होणार निर्णय 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रस्ताव मंगळवारी राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे. याबाबत पुढील पंधरा दिवसात शिखर समितीची बैठक होऊन त्यात आराखड्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. आराखड्याची रक्कम आणखी वाढली असून साधारण १२०० कोटींपर्यंत गेला आहे. अपेक्षित प्रमाणात निधी आला तर पुढील ३ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश आहे.श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू असून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत वेगाने कार्यवाही सुरू असून मंगळवारी या आराखड्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर शिखर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. पुढील १५ दिवसात जिल्हा प्रशासनाकडून शिखर समितीच्या बैठकीसाठीची वेळ घेण्यात येणार आहे. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार बैठकीत चर्चा व सादरीकरण होईल. त्यावेळी येणाऱ्या सूचनांचा अंतर्भाव करून अंतिम आराखड्याला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. शासनाने वेळेत, पुरेसा निधी दिला तर पुढील तीन वर्षात आराखडा पूर्ण करण्याचा उद्देश आहे.

बजेटमध्ये तरतुदीची शक्यताराज्य शासनाचा अर्थसंकल्प अजून सादर झालेला नाही. या बजेटमध्येच अंबाबाई मंदिर आराखड्यासाठी काही रकमेची तरतूद होण्याची शक्यता आहे. याबाबत शासन सकारात्मक असल्याने वेगाने आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे १५ दिवस आराखडा मंजूर होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील.

अजून बदल नाही..व्यापाऱ्यांनी पुनर्वसनासाठी कपिलतीर्थ मार्केट व अन्य इमारतींचा पर्याय सुचवला आहे मात्र याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब झालेला नही. बजेटपूर्वी आराखडा शासनाला सादर होणे गरजेचे असल्याने सध्यस्थितीत त्यात कोणताही नवा बदल केलेला नाही. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहेत.

संपादन व पुनर्वसनासाठीच सर्वाधिक रक्कमविकास प्रकल्पासाठी ३०० ते ४०० कोटी रुपये लागणार आहे. त्यासाठी जागेचे संपादन व मिळकतधारकांना नुकसानभरपाई यासाठीच सर्वाधिक ५०० ते ८०० कोटी रुपये लागणार आहे. त्यामुळे हजार कोटींचा हा आराखडा आता अंदाजे १२०० कोटींवर गेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरGovernmentसरकार