शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

हौशी कोल्हापूरकर! सोन्याच्या कात्रीने कापले केस; सलून व्यवसाय सुरू झाल्याचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 20:14 IST

सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा

कोल्हापूर: तब्बल तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजारामपुरी येथील रामभाऊ संकपाळ या सलून चालकाने रविवारी दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापले. दुकान सुरू झाल्यावर पहिल्या ग्राहकांचे सोन्याच्या कात्रीने केस कापेन, असा संकल्प रामभाऊ संकपाळ यांनी केला होता. त्यांनी तो पूर्ण केला. त्यातून ह्यहौशी कोल्हापूरकर या उक्तीचा प्रत्यय आला.

अटी आणि शर्तींवर सलूनमध्ये फक्त कटिंग आणि हेअरडाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजामध्ये आनंद आहे. सलून बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने या सलूनचालकांनी आंदोलनही केल होतं. राज्यभरात चार-पाच सलूनचालकांनी आत्महत्याही केल्या. त्याची दखल घेऊन सरकारने फक्त कटिंग करायला परवानगी दिली आहे.

नाभिकबांधव रामभाऊ संकपाळ यांनी सलून सुरू करताच त्यांच्या ह्यमिरर सलूनह्णमध्ये आलेल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापले. सलून बंद झाल्याने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. व्यवसायासाठी घेतलेल्या कजार्चा प्रश्नही होता. अखेर शासनाने परवानगी दिल्याने त्यांच्या दृष्टीने रविवार हा ह्य सोन्याचा दिवसह्ण होता. त्यामुळे संकपाळ यांनी दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकांचे सोन्याच्या कात्रीने केस कापले.

जावळाच्या कार्यक्रमासाठी लोकांचा आग्रह असल्याने सलून व्यवसायातून पै-पै जमा करून दीड वर्षांपूर्वी सोन्याची कात्री घेतली. तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्याचा आनंद म्हणून पहिल्या ग्राहकाचे केस सोन्याच्या कात्रीने कापले. शासनाने नाभिक समाजाला आर्थिक मदत द्यावी.- रामभाऊ संकपाळ (मिरर हेअर ब्युटी सलून, राजारामपुरी, कोल्हापूर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस