आमशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:41+5:302021-05-07T04:25:41+5:30

सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव भाऊ नाईक (वय ५८) यांचे कोरोनाने निधन झाले. ...

Amashi Gram Panchayat employee dies due to corona | आमशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

आमशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

सांगरूळ : आमशी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव भाऊ नाईक (वय ५८) यांचे कोरोनाने निधन झाले.

आमशी ग्रामपंचायतीमध्ये गेली ४० वर्षे सदाशिव नाईक हे कर्मचारी आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी गावामध्ये कोरोना योद्धा म्हणून काम केले होेते. या काळातही त्यांनी गावामध्ये पाणी सोडण्याचे काम अखंडित केले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने केलेली औषध फवारणी त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग दर्शवला होता. काही दिवसांपूर्वी ते आजारी असल्याने कामावर आले नव्हते. दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. दहा ते बारा दिवस ते खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांनी कोरोनाशी दिलेली झुंज अपयशी ठरली. बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. एक निष्ठावंत व प्रामाणिक कर्मचाऱ्याचे निधन झाल्याने आमशी गावावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Amashi Gram Panchayat employee dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.