अमन मित्तल लातूर महापालिकेचे आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:37+5:302021-01-13T05:02:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची बदली लातूर महापालिकेचे आयुक्त ...

अमन मित्तल लातूर महापालिकेचे आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची बदली लातूर महापालिकेचे आयुक्त म्हणून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पावणेतीन वर्षांपूर्वी मित्तल यांची नाशिकहून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. महापूर काळात आणि कोरोना काळात त्यांनी आघाडीवर राहून काम केले होते. त्यांची कोल्हापूरचेच जिल्हाधिकारी म्हणून बदली होणार, अशी मंत्रालयातही चर्चा होती. मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाणी निश्चित झाले असून लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांच्या बदलीचे आदेश निघणार असल्याचे सांगण्यात आले.
मित्तल यांच्या जागी वरिष्ठ अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनाही फेब्रुवारीमध्ये दोन वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु त्यांनी अतिशय चांगले काम करून दाखविले असल्याने त्यांची बदली तूर्त होण्याची शक्यता नाही. कोल्हापूरच्या जनतेनेही त्यांच्या बदलीस विरोध दर्शवला आहे.