हेरले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ३३ वर्षांनंतर मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:12+5:302021-02-05T07:02:12+5:30
हेरले : शाळा, कॉलजचे दिवस संपले की, प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये ...

हेरले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ३३ वर्षांनंतर मेळावा
हेरले : शाळा, कॉलजचे दिवस संपले की, प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र, तेहत्तीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतर प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते. हे हेरले हायस्कूल हेरले (ता. हातकणंगले) या विद्यालयातून १९८७-८८ साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. ३३ वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा रविवारी येथे उत्साहात पार पडला. यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर, वकील, पोलीस, उद्योजक ,उत्कृष्ट खेळाडू अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक गुलाब लांजेकर, महादेव डांगे, सातलिंग तोडकर, अंबाजी कोळेकर, बाळासो कोळेकर महंमद आटपाडे, फत्तेलाल देसाई, बापूसो भोसले, गोविंद आवळे, सुनंदा पाटील, सुरेखा खोत यांनी या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपदा जाधव, विद्या कोळेकर, सुनीता माळी, संगीता माने, अमोल खांडेकर, रवींद्र कांबरे, रियाज जमादार, विश्वनाथ स्वामी, आब्बास मणेर, मेहबूब जमादार, सुनील भोसले, तानाजी कागले तसेच यावेळी अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्तविक गजानन कोले यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पोतदार तर आभार प्रकाश कांबरे यांनी मानले.
फोटो :-
हेरले (ता. हातकणंगले) येथील हेरले हायस्कूल, हेरले येथे सन ८७-८८ च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ३३ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा साजरा केला.