हलकर्णी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:54+5:302021-09-09T04:28:54+5:30
माजी प्राचार्य प्रा. डॉ. अनिल गवळी व समन्वयक प्रा. डॉ. आय. आर. जरळी यांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांचे योगदान ...

हलकर्णी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
माजी प्राचार्य प्रा. डॉ. अनिल गवळी व समन्वयक प्रा. डॉ. आय. आर. जरळी यांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांचे योगदान महाविद्यालयाच्या विकासात कसे महत्त्वाचे आहे, हे सांगितले. एकूण ७० माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यात भाग घेतला. यावेळी प्रा. डॉ. मोहन घोळसे, प्रा. एन. डी कार्वेकर, प्रा. हिरामणी, युवराज पाटील, वैभव केणेकर, ज्योती पाटील, सागर चिखलकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी व आदर्श माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, हिरामणी, युवराज पाटील यांनी देणगी स्वरूपात शाळेला मदत दिली. मेळाव्यास प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सचिव प्रा. सुहास भोगण यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. ए. एस. बागवान यांनी आभार मानले.