शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठरावाबरोबर सचिव, अध्यक्ष अन्‌ प्रोसेंडिंगही दुबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:29 IST

Gokul Milk Kolhapur-कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये दोन सचिव, दोन अध्यक्षांसह प्रोसेंडिंग दोन दाखल करून ठरावावर दावे करण्यात आले. कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन दूध संस्थांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. संचालक मंडळाचे समान बलाबल आहे, मात्र सचिवाने मखलाशी केल्याने ठरावाचा गुंता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देठरावाबरोबर सचिव, अध्यक्ष अन्‌ प्रोसेंडिंगही दुबारगोकुळची सुनावणी : समान बलाबल, त्यातही सचिवाची मखलाशी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) दुबार ठरावांची बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये दोन सचिव, दोन अध्यक्षांसह प्रोसेंडिंग दोन दाखल करून ठरावावर दावे करण्यात आले. कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन दूध संस्थांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. संचालक मंडळाचे समान बलाबल आहे, मात्र सचिवाने मखलाशी केल्याने ठरावाचा गुंता निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.ह्यगोकुळह्णच्या प्रारूप यादीवर ३५ दुबार ठराव, तर ४१ इतर हरकती आल्या आहेत. ३५ दुबार ठरावांवर मंगळवार व बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. बुधवारी १९ दूध संस्थांच्या दुबार ठरावांवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी सुनावणी घेऊन संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले.

संघाच्या ठरावाला लाखमोलाची किंमत असल्याने प्रतिनिधीच्या नावासाठी संस्थांतर्गत संघर्ष उफाळून येतो. त्यातूनच ८ ठरावधारकांनी आपापसात समझोता करून हरकत मागे घेतली. उर्वरित हरकतीमध्ये संचालक मंडळाची संख्या समसमान आहे, मात्र सचिवाने आपल्या मर्जीतील गटाकडे वजन टाकल्याने पेच निर्माण झाला आहे. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी ठराव केला, मात्र ते अल्पमतात आहेत, अशा तक्रारी सुनावणीदरम्यान समोर आल्या.कागल व शाहुवाडी तालुक्यातील दोन संस्थांनी तर चक्क दोन अध्यक्ष, दोन सचिव आणि दोन प्रोसेडिंगच हजर केल्याने अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला. दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेतले आहे

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर