शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद: कर्नाटकचे मुख्यमंत्री आज कोल्हापुरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 12:56 IST

अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह सांगली जिल्ह्याला याचा फटका बसणार

मोहन सातपुतेउचगाव: कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकतेच्या पवित्र्यात आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई हे आज, कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावरील कार्यक्रमासाठी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळावर आले असता शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बोंम्मई यांना निवेदन देऊन आपली भूमिका मांडली आहे.अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह सांगली जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बोंम्मई यांना यावर तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच धरणाची उंची वाढवण्यास विरोध दर्शवला. अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१२ ठेवावी, अशी मागणी वारंवार केली जाते. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद एकीकडे न्यायालयात असताना अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. पाच मीटरने उंची वाढवल्यानंतर अलमट्टीची पाणी पातळी थेट शिरोळ बंधा-यापर्यंत पोहोचणार असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ञ करत आहेत. यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात जाणाऱ्या नद्यांमधले पाणी पुढे सरकणार नाही. पावसाळ्यात ही दोन्ही शहरं जलमय होऊ शकतात. तर शिरोळ तालुक्यातील साडेपाच ते सहा हजार एकर जमीन नापीक बनण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वाद आणखी तापण्याची चिन्हं आहेत.अलमट्टी धरणाचा तिढा, कोल्हापूरला पाण्याचा वेढाअलमट्टी धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरांना अलमट्टी धरण कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सांगलीपासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अलमट्टी धरणाचा सांगली आणि कोल्हापुरातल्या महापुराशी थेट संबंध नसल्याचा एक मतप्रवाह आहे. दरम्यान, अलमट्टीची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रातून जोरदार विरोध सुरू झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकDamधरण