शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Flood: अलमट्टी वादावर कायमचा तोडगा काढावा; शरद पवारांची केंद्र सरकारकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 17:02 IST

पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही.

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेले दोन-तीन दिवस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 2005 साली पूर आल्यानंतर पाण्याची पातळी ग्राह्य धरली ती चुकल्याने यंदाची परिस्थिती उद्भवली आहे. कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर यंदाच्या पाण्याची पातळी त्याहून अधिक नोंद करुन त्याप्रकारे उपाययोजना कराव्यात असं त्यांनी सांगितले. 

शरद पवार म्हणाले की, अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारने घ्यायला हवा. अलमट्टीचं पाणी वेळीच सोडलं असतं तर सांगली, कोल्हापुरात पूर आला नसता. कर्नाटक सरकारने पाणी सोडलं नाही. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारमध्ये संवाद झाला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांनी सांगितले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे तरी पाण्याचा विसर्ग सुरु झाला नाही. त्यानंतर पंतप्रधानांशी मी बोलल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरु झाला. 

तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला घेऊन केंद्र सरकारने बसलं पाहिजे, अलमट्टी वादावर तोडगा काढायला हवा. पूरग्रस्तांवर जे कर्ज असेल ते माफ झाले पाहिजे, रस्ते, सार्वजनिक आरोग्य यासाठी आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. लातूरला 1 लाख घरं बांधली होती तशाप्रकारे पूरग्रस्तांची घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने प्रयत्न करावेत असं शरद पवारांनी सांगितले.  ऊस उत्पादक क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादकांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. पाणी ओसरल्यानंतर माती खाली खचल्याची दिसत आहे. शेत मजूरांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न सरकारने करावा असंही पवार म्हणाले.  

पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. काही ठिकाणी ट्रक अडवले जात असल्याची माहिती आहे. शासनाने गरजू पूरग्रस्तांना ही मदत पोहचेल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकारमधील लोकांना अशा परिस्थितीला तोंड देण्याचा अनुभव नाही. काही गावांना भेटी देऊन निघून गेल्यानं काम होतं नाही. राज्यकर्ते याठिकाणी असताना प्रशासनाची हालचाल तातडीने होते. लातूरला भूकंप झाला तर मी 15 दिवस तिथे होतो अशी आठवणही शरद पवारांनी करुन दिली.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरSatara Floodसातारा पूरCentral Governmentकेंद्र सरकार