खासगी रुग्णालयांना परवानगी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:05+5:302021-04-28T04:25:05+5:30

संकेश्वर : कोरोनाला आळा घालण्यासाठी नियमांचे पालन केल्यास खासगी रुग्णालयांना कोरोना सेंटरला परवाना देऊ, अशी ग्वाही तालुका वैद्यकीय अधिकारी ...

Allow private hospitals | खासगी रुग्णालयांना परवानगी देऊ

खासगी रुग्णालयांना परवानगी देऊ

संकेश्वर : कोरोनाला आळा घालण्यासाठी नियमांचे पालन केल्यास खासगी रुग्णालयांना कोरोना सेंटरला परवाना देऊ, अशी ग्वाही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय कुडची यांनी दिली.

संकेश्वर येथे खासगी व सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा आपत्ती निवारण प्रमुख शिवानंद हुगार होते.

कुडची म्हणाले, शहरातील हावळ व अन्नपूर्णा रुग्णालयास कोविड सेंटरसाठी परवानगी दिली आहे. लवकरच आणखी एक कोविड सेंटर सुरू करणार आहोत. खासगी रुग्णालयांनीही कोविड व नॉन कोविड विभागांची उभारणी करून सरकारी दरात रुग्णांवर उपचार करावेत.

यावेळी डॉ. दत्ता दोडमणी, डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. सिदाण्णा ओंकार, रमेश दोडवनगी, डॉ. शामला फनार आदी उपस्थित होते.

--------------------------

* फोटो ओळी :

संकेश्वर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उदय कुडची यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २७०४२०२१-गड-०२

Web Title: Allow private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.