रात्री बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST2020-12-25T04:19:13+5:302020-12-25T04:19:13+5:30
प्रतिक्रिया लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता काही प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीजने गती घेतली आहे. आता रात्री अकरापर्यंतच व्यवसाय करण्याच्या मर्यादेमुळे अडचण ...

रात्री बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या
प्रतिक्रिया
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता काही प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीजने गती घेतली आहे. आता रात्री अकरापर्यंतच व्यवसाय करण्याच्या मर्यादेमुळे अडचण वाढली आहे. कोल्हापुरातील अनेकजण रात्री नऊनंतरच जेवण्यासाठी हॉटेलमध्ये येतात. त्याचा आणि व्यवसायाच्या सद्यास्थितीचा, त्यावर रोजगार अवलंबून असणाऱ्यांचा विचार करून शासनाने रात्री एक तासाने वेळ वाढवून द्यावी.
-आनंद माने, माजी अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
प्रतिक्रिया
कोरोनाच्या नियमांचे पालन करून सध्या हॉटेल व्यवसाय सुरू आहे. संचारबंदीला आमचा विरोध नाही. मात्र, सध्या व्यवसायाच्या हंगामाचे दिवस असल्याने एक तासांनी वेळ वाढवून देण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा.
-उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ
आकडेवारी दृष्टिक्षेपात
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या : १५००
जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या : सुमारे ३७००
कामगारांची संख्या : सुमारे २५,०००