शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

रात्री बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:35 IST

Coronavirus Unlock kolhapur HotelNews- नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत हे हॉटेल व्यवसायाच्या हंगामाचे दिवस आहेत. अशा स्थितीत हॉटेल रात्री सुरू ठेवण्याची वेळ एक तासाने वाढवून ती बारापर्यंत करण्यात यावी. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यवसायाला राज्य शासनाने याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक, व्यावसायिकांनी केली.

ठळक मुद्देरात्री बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या व्यावसायिकांची मागणी : शासनाने सहकार्य करावे

 कोल्हापूर : नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे स्वागत हे हॉटेल व्यवसायाच्या हंगामाचे दिवस आहेत. अशा स्थितीत हॉटेल रात्री सुरू ठेवण्याची वेळ एक तासाने वाढवून ती बारापर्यंत करण्यात यावी. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व्यवसायाला राज्य शासनाने याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक, व्यावसायिकांनी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे दि. १५ मार्चपासून जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट बंद झाली. तब्बल सात महिने ती बंद राहिली. त्यामुळे हॉटेल आणि टुरिझम इंडस्ट्रीला सुमारे ४५० कोटींचा फटका बसला. शासनाच्या कोरोनाबाबतच्या नियमावलींचे पालन करत टप्प्या-टप्प्याने ऑक्टोबरपासून ती पूर्ववत सुरू झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने बऱ्यापैकी हॉटेल व्यवसायाने गती घेतली. या व्यवसायातील कामगारांना दिलासा मिळाला. मात्र, कोरोनाचा भविष्यातील संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार कोल्हापुरात मंगळवारपासून ते दि. ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या संचारबंदीची वेळ रात्री अकरा ते सकाळी सहा अशी आहे. त्यामुळे रात्री अकरानंतर सर्व व्यवहार बंद ठेवावे लागत आहेत. कोल्हापुरात नोकरी, व्यवसाय आटोपून रात्री नऊनंतर अधिकतर जेवण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये येतात. ही वेळ आणि हंगामाचे दिवस लक्षात घेऊन शासनाने सध्या हॉटेल, रेस्टॉरंट रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता काही प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीजने गती घेतली आहे. आता रात्री अकरापर्यंतच व्यवसाय करण्याच्या मर्यादेमुळे अडचण वाढली आहे. कोल्हापुरातील अनेकजण रात्री नऊनंतरच जेवण्यासाठी हॉटेलमध्ये येतात. त्याचा आणि व्यवसायाच्या सद्यास्थितीचा, त्यावर रोजगार अवलंबून असणाऱ्यांचा विचार करून शासनाने रात्री एक तासाने वेळ वाढवून द्यावी.-आनंद माने,माजी अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

कोरोनाच्या नियमांचे पालन करून सध्या हॉटेल व्यवसाय सुरू आहे. संचारबंदीला आमचा विरोध नाही. मात्र, सध्या व्यवसायाच्या हंगामाचे दिवस असल्याने एक तासांनी वेळ वाढवून देण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा.-उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या : १५००
  • जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या : सुमारे ३७००
  • कामगारांची संख्या : सुमारे २५,०००
टॅग्स :hotelहॉटेलCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर