कोल्हापूर : केवळ पार्सल सेवेने रोजगार मिळत नाही तरी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल कामगार संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
मागील वर्षी कोरोनामुळे दहा महिन्यांचा पगार मिळाला नाही. यावर्षीही हॉटेल बंद ठेवले तर लाखो हॉटेल कामगार व कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळणार आहे तरी नियमांचे पालन करून हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, हॉटेल मालक १० टक्के कामगारांना कामावर ठेवून ९० टक्के कामगारांना विनावेतन घरी पाठवत आहेत. त्याबाबत हॉटेल मालकांसोबत संयुक्त बैठक घ्यावी. बंद काळात कामगारांना मासिक २० हजार रुपये आर्थिक मदत व धान्य द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राज्य संघटक गिरीष फोंडे, भैरव कांबळे, मोहन गावडे, सुशांत पोवार, आनंदा कांबळे, विशाल भोसले उपस्थित होते.
--