शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

corona in kolhapur- जीवनावश्यक वस्तूंच्या साडे आठ हजार किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:14 IST

‘कोरोना विषाणू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गरजूंना १० जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट स्वीकारून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ किट स्वीकारून त्यातील ८५४२ किट गरजंूना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या साडे आठ हजार किटचे वाटपजिल्ह्यातील ३० ठिकाणी किट स्वीकारणे, अन्नवाटप सुरू

कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गरजूंना १० जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे किट स्वीकारून त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ किट स्वीकारून त्यातील ८५४२ किट गरजंूना देण्यात आले आहेत.उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण अध्यक्षतेखाली जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, नायब तहसीलदार सुहास घोरपडे, अर्चना कुलकर्णी, आदींसह सहाजणांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. ही महासैनिक दरबार हॉल येथे मदतीचे किट स्वीकारत आहे. तसेच येथून जिल्ह्यातील ३० ठिकाणांशी समन्वय साधून मदतीच्या वाटपाचा आढावा घेत आहे.

एकदम मोठ्या स्वरूपात किट्स असतील तर ते स्वीकारून जागेवरच गरजूंना याच ठिकाणी वाटप केले जात आहे. इतर किट्स घेऊन कोणती संस्था किंवा व्यक्ती येत असेल तर ते संबंधित कार्यक्षेत्रातील ‘पॉइंट आॅफ कलेक्शन अ‍ॅँड डिस्ट्रिब्यूशन’ (पीसीडी) पाठविले जात आहेत.

ही समिती कार्यान्वित झाल्यापासून गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील ३० ठिकाणी ९३९६ जीवनावश्यक वस्तूंचे किट प्राप्त झाले आहेत. त्यातील ८५४२ किटचे गरजवंतांना महापालिका, नगरपालिका, तहसीलदार कार्यालय स्तरावर वाटप करण्यात आले आहे. यातील ६०८ किट शिल्लक असून, त्याचेही वाटप लवकरच केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात ४८ हजार बिस्किट पुड्यांचे वितरणमहासैनिक दरबार येथील कार्यालयात जिल्ह्यातील नऊ ‘पीसीडी’ केंद्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांच्या माध्यमातून ४८ हजार ३८४ बिस्किट पुड्यांचे ३०४ बॉक्स वितरण करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेसाठी ५०८८ बिस्किटांचे पुडे, करवीर तहसीलदार कार्यालयाला ५०८८, कागल तहसीलदार कार्यालयाला ८३०४, हातकणंगले तहसीलदार कार्यालयाला १०१७६, गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयाला २०६४, पन्हाळा तहसीलदार कार्यालयाला २०६४, चंदगड तहसीलदार कार्यालयाला ५०८८, गगनबावडा तहसीलदार कार्यालयाला ६३८४, शिरोळ तहसीलदार कार्यालयाला ४१२८ पुडे देण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर