टांगा व्यावसायिकांना कडबा कुटी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:02+5:302021-07-04T04:18:02+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र रिक्षा सेनेतर्फे शहरातील १५ टांगा व्यावसायिकांना प्रत्येकी एक पोती भुसा व कबडा कुटी वाटप करण्यात आले. ...

टांगा व्यावसायिकांना कडबा कुटी वाटप
कोल्हापूर : महाराष्ट्र रिक्षा सेनेतर्फे शहरातील १५ टांगा व्यावसायिकांना प्रत्येकी एक पोती भुसा व कबडा कुटी वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टांगा व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करणे अवघड बनले असून हा व्यवसाय इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. अशा टांगा व्यावसायिकांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, विलास गवळी, शिवाजीराव ढवण, पांडुरंग शेळके, राजेंद्र जाधव, संजय गवळी, मोहन बागडी, चंद्रकांत भोसले आदी उपस्थित होते.
फोटो : ०३०७२०२१-कोल-टांगा
ओळी : कोल्हापुरातील निवृत्ती चौकात महाराष्ट्र रिक्षा सेनेतर्फे टांगा व्यावसायिकांना मान्यवरांच्या उपस्थितीत कडबा कुटी देण्यात आली.
मुस्लिम वधूवर मेळावा आज
कोल्हापूर : आसान निकाह मॅरेज इन्फाॅरमेशन सेंटरतर्फे कोल्हापूर शहरातील मुस्लिम समाजातील वधू-वरांकरिता परिचय मेळावा आज, रविवारी दसरा चौकातील टायटन शोरुमजवळ सकाळी ९ ते दुपारी ३ यादरम्यान आयोजित केला आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेमार्फत सलीम शेख व इकबाल उमराणी यांनी केले आहे.