पंचगंगा नदीत सापडला ॲलिगेटर गार मासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:30+5:302021-07-18T04:18:30+5:30
येथील शेतकरी किशोर दळवी यांनी प्रयाग चिखली परिसरातील पंचगंगा नदीपात्रात लावलेल्या जाळ्यामध्ये मगरीप्रमाणे दिसणारा मासा सापडला. पहिल्यांदा मगर ...

पंचगंगा नदीत सापडला ॲलिगेटर गार मासा
येथील शेतकरी किशोर दळवी यांनी प्रयाग चिखली परिसरातील पंचगंगा नदीपात्रात लावलेल्या जाळ्यामध्ये मगरीप्रमाणे दिसणारा मासा सापडला. पहिल्यांदा मगर असल्यासारखे वाटले. मात्र थोड्या वेळाने ही माशाची दुर्मीळ जात असल्याचे लक्षात आले. साधारण लांबी अडीच ते तीन फुटांपर्यंत आहे.
वास्तविक या माशाची लांबी दहा फुटांपर्यंत वाढू शकते. तसेच मगरीप्रमाणे तोंड व दात असल्यामुळे चावा घेऊन मानवाला तो गंभीर इजा पोहोचवू शकतो. अलीकडेच पंचगंगा नदीमध्ये वेळोवेळी मगरीचा वावर दिसत असताना मगरीप्रमाणेच दिसणारा मासा सापडल्याने परिसरात दुर्मीळ दिसणाऱ्या माशाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
१८ ॲलिगेटर मासा
फोटो ओळी - प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे किशोर दळवी यांना पंचगंगा नदीपात्रामध्ये सापडलेला ॲलिगेटर गार नावाचा दुर्मीळ मासा.