शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Maharashtra Vidhan Sabha 2019 : आघाडीने महाराष्ट्राची १५ वर्षे फुकट घालवली : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 18:32 IST

१५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.

ठळक मुद्देआघाडीने महाराष्ट्राची १५ वर्षे फुकट घालवली : आदित्य ठाकरेगडहिंग्लजमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला,  वरळीत उभारणार कोल्हापूर भवन

गडहिंग्लज : १५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.कागल व चंदगडविधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या पटांगणात ही सभा झाली.ठाकरे म्हणाले, युतीमध्ये कोणतेही छुपे वार, गनिमी नाही, जे कांही आहे ते समोरासमोर आहे. आघाडी मात्र फक्त बिघाडीसाठीच बनली असून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महायुतीच सक्षम आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठीच महायुती झाली आहे.मंडलिक म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीतच शिवसेनेचे उमेदवार कागल व चंदगडमधून निवडून द्यायला पाहिजे होते. गडहिंग्लज विभागातील रखडलेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीलाच साथ द्या.

शिवसेनेचे कागलचे उमेदवार संजय घाटगे व चंदगडचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार, अंबरीश घाटगे, प्रभाकर खांडेकर, सुनिल शिंत्रे, विरेंद्र मंडलिक, संभाजी भोकरे, उत्तम कांबळे, जयश्री तेली, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, श्रद्धा शिंत्रे, शशीकला पाटील, रियाज शमनजी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप माने यांनी सूत्रसंचलन केले. वरळीत उभारणार कोल्हापूर भवनचंदगड, आजरा, गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य नागरिक नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्यासाठी वरळीमध्ये आपण कोल्हापूर भवन उभारणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड