स्थानिक परिस्थिती पाहूनच युती : सावकर मादनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST2020-12-16T04:38:02+5:302020-12-16T04:38:02+5:30

उदगांव : शिरोळ तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक उदगांव (ता. शिरोळ) येथे पार पडली. संबंधित ...

Alliance after seeing the local situation: Savkar Madnaik | स्थानिक परिस्थिती पाहूनच युती : सावकर मादनाईक

स्थानिक परिस्थिती पाहूनच युती : सावकर मादनाईक

उदगांव : शिरोळ तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक उदगांव (ता. शिरोळ) येथे पार पडली. संबंधित गावातील स्थानिक परिस्थिती पाहून युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक यांनी दिली. मादनाईक म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील होऊ घातलेल्या आगामी ३३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तयारी सुरू केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर चर्चा करून युतीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

यावेळी आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, राम शिंदे, उपसभापती सचिन शिंदे, शैलेश आडके, मिलिंद साखरपे, सागर संभूशेटे, शैलेश चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - १५१२२०२०-जेएवाय-०१

फोटो ओळ - उदगांव (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडली.

Web Title: Alliance after seeing the local situation: Savkar Madnaik