शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करणार

By विश्वास पाटील | Updated: March 3, 2024 15:25 IST

Kolhapur News: नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा जाहीर विरोध असुन शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करण्याचा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला.

- विश्वास पाटील कोल्हापूर :  नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना आहे. त्यामुळे या मार्गाला काँग्रेसचा जाहीर विरोध असुन शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी सर्वांनी संघटित ताकद उभी करण्याचा निर्धार येथे व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक झाली.

     नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातून जाणार आहे. या मार्गासाठी हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार आहेत .त्यामुळे या शक्तीपीठ मार्गाला विरोध दर्शवण्यासाठी विविध गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची भेट घेतली. 

आमदार सतेज पाटील म्हणाले,  कोणत्याही कार्याची कोल्हापुरातून झालेली सुरुवात ही राज्यभर पोहचत असते. त्यामुळें आणि नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची सुरवात कोल्हापुरातून करूया. या महामार्गाची माहिती अजुनही लोकांना नाही.  खरोखरचं याची लोकांना गरज आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थीत करत, जमिनी घेवून रस्ता करणे हे संयुक्त ठरणार आहे काय? याचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ते 94 टक्के शेतकरी दोन एकराच्या आतील आहेत. या महामार्गाच्या विरोधासाठी अकरा मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. गरज नसलेला हा महामार्ग असुन कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली ही नको ती कल्पना आहे. त्यामुळे काँग्रेसचा याला जाहीर विरोध राहील असेही त्यांनी जाहीर केले.

 जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंबरीश घाटगे यांनी शेतकऱ्यांना न्याय आणि ताकद देण्याची शक्ती केवळ सतेज पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळें या लढ्याचे नेतृत्व आमदार पाटील यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. शक्ति मार्ग मुळे जवळपास 400 एकर जमीन या महामार्गाखाली जाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमीहिन होणार असल्याचही घाटगे यांनी  सांगितले.. राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे अध्यक्ष एम पी..पाटील यांनी, शक्ती पीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आता विरोधाशिवाय पर्याय नाही, जनरेट्याबरोबरच न्यायालय लढा देखील लढूया असे आवाहन  केल.

बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी देवाधर्माच्या नावाखाली प्रत्येकाची गळचेपी करण्याचे काम सरकार करत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही घेण देण नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्ग परतवून लावूया असे आवाहन केले.

यावेळी सुधीर पाटोळे, मल्हारी पाटील, दादासो पाटील यांच्यासह तेरा गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र