शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणालगतच्या सर्वच अनधिकृत फार्महाऊसची तपासणी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By उद्धव गोडसे | Updated: May 7, 2025 17:24 IST

पाटबंधारे विभागाकडून फार्महाऊस मालकांना नोटिसा, कारवाई होणार

उद्धव गोडसेकोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वच तलाव आणि धरणांच्या जलाशयालगत झालेल्या अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी विविध विभागांना दिले. नियमबाह्य बांधकामे करून जलाशयांना धोका निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. पाटबंधारे विभाग, जलसंधारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.अणदूर धरणातील दुर्घटनेनंतर 'लोकमत'ने केलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये धरणालगत झालेल्या बांधकामांची वस्तुस्थिती समोर आली. शासकीय नियमांमधील पळवाटांचा आधार घेऊन थाटलेले फार्महाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेल्समुळे जलाशयांना निर्माण झालेला धोका स्पष्ट झाला. हा धोका जिल्ह्यातील सर्वच जलाशयांना असल्याने याबद्दल वेळेची उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'अणदूर धरण दुर्घटनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच तलाव, धरणे आणि जलाशयांच्या सुरक्षेसाठी प्रश्न चर्चेत आला आहे. पाणलोट क्षेत्रातील आणि जलाशयांच्या सुरक्षेला धोकादायक असलेल्या अतिक्रमणांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश जलसंधारण, पाटबंधारे विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर नियमबाह्य बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही जलाशयाचा गैरवापर होऊ नये, तसेच तिथे प्रदूषण होऊ नये याला प्राधान्य दिले जाईल.'

पाटबंधारे विभागाकडून नोटिसापाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील जलाशयांलगत असलेले सर्व फार्महाऊस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांना तातडीने नोटिसा पाठविल्या आहेत. बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा उठाव याबद्दल नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यापोहणे आणि बोटिंगची परवानगी नसलेल्या जलाशयांजवळ सूचना फलक लावणे आणि सुरक्षारक्षकांची गस्त वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. गरज पडल्यास पोलिसांची मदत घेऊन हुल्लडबाजांना शिस्त लावावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्रुटींची दुरुस्ती करू ; फार्महाऊस मालकांची ग्वाहीअणदूर येथील फार्महाऊस ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी 'लोकमत'च्या कार्यालयात येऊन त्यांची बाजू मांडली. पाटबंधारे विभागाच्या निकषांनुसार काही त्रुटी राहिल्या असल्यास त्याची दुरुस्ती करू. प्रदूषण आणि हुल्लडबाजी होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. निसर्गाची जपणूक करून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच वेदांतिका माने यांचा प्लॉट त्यांनी दहा वर्षांपूर्वीच महेश भोसले यांना विकला आहे. ग्रामपंचायतीकडे जुन्याच नावांची नोंद असल्याने त्यांचे नाव यादीत आल्याचे ओनर्स असोसिएशनने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणtourismपर्यटनcollectorजिल्हाधिकारी