सर्व दुकाने उद्यापासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:54+5:302021-07-18T04:18:54+5:30
कोल्हापूर : मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट ९.७ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने उद्या, सोमवार ते शुक्रवारपर्यंत ...

सर्व दुकाने उद्यापासून सुरू
कोल्हापूर : मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट ९.७ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाने उद्या, सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश आता स्तर ३ मध्ये झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले सगळे व्यवसाय, दुकाने उद्यापासून खुली होणार आहेत, मात्र काही बाबतीत निर्बंध कडक ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.
सध्या जिल्ह्यातील संसर्गाची लाट ओसरत असून, ८ ते १४ जुलै या आठवड्यातील सरासरी आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रेट ९.७ टक्क्यांवर आला आहे. तसेच मागील दोन आठवड्यांतील संसर्गांचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यासाठी सोमवारपासून (दि. १९) स्तर ३ चे निर्बंध लागू करण्याचा, तसेच काही बाबींमध्ये निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू राहतील व शनिवारी-रविवारी बंद असतील. अत्यावश्यक सेवा रोज वरील वेळेत सुरू असतील.
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याने एप्रिल महिन्यापासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. मे आणि जूनमध्ये जिल्ह्यात संसर्गाने कहर केला. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश स्तर ४ मध्ये झाला. यामुळे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय व दुकाने बंद आहेत. दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक पातळीवर पाच दिवसांसाठी सूट देण्यात आली होती. एवढाच काय तो दिलासा होता. त्यामुळे व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत पाठपुरावा केला होता. शुक्रवारीदेखील त्यांनी आरोग्यामंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच दुकाने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत आदेश आला नव्हता तो शनिवारी सायंकाळी काढण्यात आला.
----
हे राहील सुरू
-अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज सकाळी ७ ते ४ यावेळेत.
-अत्यावश्यक वगळता अन्य सर्व दुकाने व कार्यालये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत.
- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, फिरणे, सायकलिंग, खेळ, सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत.
-रेस्टॉरंट सर्व दिवशी फक्त पार्सल व घरपोच सेवा.
-चित्रीकरण अलगीकरणाच्या व्यवस्थेसह सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.
-लग्नसमारंभ २५ माणसांत, अंत्यविधी २० माणसांत
-स्थानिक स्वराज्य तसेच सहकारी संस्थांच्या सभा सभागृहाच्या ५० टक्के क्षमतेसह.
-व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सर्व दिवशी सकाळी ७ ते ४.
---
हे बंद राहील
-मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह.
-कार्यक्रम मेळावे