शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, आदी राज्यपातळीवरील संघटनांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, आदी राज्यपातळीवरील संघटनांच्या सूचनेनुसार आणि कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करून कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवार (दि.१२) सुरू करण्याचा निर्णय व्यापारी, व्यावसायिकांनी शुक्रवारी घेतला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कार्यालयात बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील राज्य शासनाच्या निर्बंधानुसार तिसऱ्या दिवशीही दुकाने बंद राहिली.

शासनाने सर्व व्यापारी आस्थापना सुरू ठेवण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्याचे कोल्हापूर चेंबरने जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी विविध संलग्नित संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर राज्यपातळीवरील संघटनांच्या सूचनेनुसार आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री ८ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवू नयेत. शनिवार, रविवारच्या विकेंड लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले. दरम्यान, दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्यभरातील व्यापारी, व्यावसायिकांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानुसार कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांनी शुक्रवारीदेखील दुकाने बंद ठेवली. काही जणांनी सकाळी दुकाने सुरू करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना ही दुकाने बंद ठेवण्याची सूचना कोल्हापूर चेंबरने केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वळगता अन्य दुकाने बंद राहिली. त्यामुळे महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

-----------------------------------

कारवाई होऊ देणार नाही

महाराष्ट्र चेंबरने केलेल्या आवाहनानुसार कोल्हापुरातील दुकाने सोमवारपासून सुरू केली जाणार आहेत. प्रशासनाच्या वतीने कोणी दुकाने बंद करण्यासाठी आल्यास कोल्हापूर चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा. आम्ही त्याठिकाणी दुकान बंद करण्याची कारवाई होऊ देणार नाही, असे संजय शेटे यांनी सांगितले. कोरोनाबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कचा वापर या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याने कारवाई झाल्यास त्याला कोल्हापूर चेंबर जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------------

सराफ व्यावसायिकांची दुकाने सुरू होणार

कोल्हापूर चेंबरचा निर्णय आणि गुढीपाडव्यानिमित्त सोमवारपासून कोल्हापूरमधील सराफ व्यावसायिकांची दुकाने सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.