जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:21+5:302021-07-18T04:18:21+5:30
-तमदलगे येथे सत्कार कार्यक्रम जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार आहे. ...

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार
-तमदलगे येथे सत्कार कार्यक्रम
जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार आहे. राज्यात आदर्श जिल्हा परिषद म्हणून नावारूपाला आणू, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी व्यक्त केले. विविध संस्थाच्या माध्यमातून दलितमित्र अशोकराव माने यांनी हजारो तरुणांच्या हाताला काम दिले आहे. मोठ्या संघर्षातून त्यांनी केलेली प्रगती ही नक्कीच अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणी येथे सत्कार कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. या वेळी जि. प. सदस्य अरुणराव इंगवले यांच्या हस्ते अध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार संपन्न करण्यात आला. या वेळी सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव माने यांनी स्वागत केले. याप्रसंगी जि. प. चे नूतन उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, वंदना जाधव, रसिका पाटील, शिवानी भोसले, कोमल मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला.
अरुणराव इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, अमर पाटील, दीनानाथ मोरे, मयूर कोळी, रमजान मुजावर, डॉ. अरविंद माने, सुहास राजमाने, दिलीप काळे, गजानन माने, विवेक कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १७०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथे नूतन जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांचा अरुणराव इंगवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. अशोकराव माने, प्रसाद खोबरे, डॉ. नीता माने, डॉ. अरविंद माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.