शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वच पक्षांना स्वतंत्रपणे लढण्याची खुमखुमी, राजकीय हालचाली गतिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:22 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी , महायुती म्हणून एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची, याची सर्वच घटक ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी, महायुती म्हणून एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची, याची सर्वच घटक पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना, उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी जेथे समझोता शक्य आहे तेथे एकत्र लढावे आणि जेथे शक्य नाही तेथे मैत्रिपूर्ण लढावे, अशी सावध भूमिका घेतली आहे. परंतु चाचपणीनंतर सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते यासंबंधीचा निर्णय घेणार आहेत.कोल्हापूर महानगरपालिकेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांनी स्वतंत्र लढविलेल्या आहेत. राज्यात व देशात काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-शिवसेना एकत्र हाेते; त्यामुळे आपापसात सामंजस्य, योग्य समन्वय राखत महापालिकेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ-आमदार सतेज पाटील एकत्र होते. त्यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, ताराराणी आघाडीचे महादेवराव महाडिक एकत्र होते. खासदार धनंजय महाडिक यांचीही छुपी मदत भाजप-ताराराणी आघाडीला मिळाली. त्यावेळी सहा-सात जागा कमी मिळाल्याने भाजपचे महापालिकेतील सत्ता मिळविण्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही.काँग्रेस-राष्ट्रवादीने २०१५च्या निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या. फोडाफोडीचे राजकारण घडू नये म्हणून शिवसेनेशी सत्तेची पदे देण्याचा समझोता करून त्यांच्या ४ नगरसेवकांनाही आपल्या आघाडीत घेतले. त्यामुळे पाच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता राखली. परंतु त्यानंतरही भाजप-ताराराणी आघाडीने महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न सोडलेले नाही.२०२२ मध्ये घडलेल्या राज्यातील घडामोडींचा जिल्ह्याच्या राजकारणावर देखील परिणाम झाला.शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र पक्ष झाले. कार्यकर्ते, नगरसेवक विभागले गेले. सध्या भाजपसोबत शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच काँग्रेससोबत राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धवसेना आहे. चार महिन्यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत सोबती बदलले आहेत, नेते बदललेले आहेत. त्यामुळे नेमकी भूमिका काय घ्यावी, याचा अंदाज नसल्याने एकत्र लढायचे की स्वतंत्र, याची चाचपणी सुरू झाली आहे.कोण कोणासोबत असेल?महाविकास आघाडी- आमदार सतेज पाटील, खासदार शाहू छत्रपती, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले.महायुती- मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, आदिल फरास, सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी