कोल्हापुरात आज आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धा

By Admin | Updated: December 6, 2014 00:27 IST2014-12-06T00:08:06+5:302014-12-06T00:27:14+5:30

१२ वर्षांखालील मानांकित खेळाडूंचा सहभाग

All India Ranking Tennis Tournament in Kolhapur today | कोल्हापुरात आज आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धा

कोल्हापुरात आज आॅल इंडिया रँकिंग टेनिस स्पर्धा

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे उद्या, शनिवारी आॅल इंडिया रँकिंग टॅलेंट टेनिस स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शाहू स्टेडियम येथील साठमारीच्या टेनिस कॉम्प्लेक्समध्ये होणार असून स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांतून बारा वर्षांखालील ६४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती के.एस.ए.चे मानद सहसचिव सरदार मोमीन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत कर्नाटक, गोवा या राज्यांसह पुणे, सोलापूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे प्रसाद इंगळे, कुणाल पवार, सोनल पाटील, गार्गी हवालदार, तर राज्यातील गिरीष चौगुले, अश्मित बडे, झाकी कलगडे, जिया लोदा, इबीतिसॅम शेख, हर्षाली मांडवकर या मानांकित खेळाडूंचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: All India Ranking Tennis Tournament in Kolhapur today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.