अखिल भारतीय हिंदू अधिवेशन बुधवारपासून

By Admin | Updated: June 10, 2017 20:03 IST2017-06-10T20:03:35+5:302017-06-10T20:03:35+5:30

हिंदू राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे.

All India Hindu Convention from Wednesday | अखिल भारतीय हिंदू अधिवेशन बुधवारपासून

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन बुधवारपासून

कोल्हापूर : हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभारण्याच्या उद्देशाने बुधवार (दि. १४) पासून गोवा येथे सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाने प्रारंभ होत आहे, अशी माहिती किरण दुसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील दीडशेंहून अधिक हिंदू संघटनांचे चारशेंहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्याअंतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करणार आहेत. हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असला तरी काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्या बंदी, जवानांवरील दगडफेक, त्यांच्या हत्या यांबाबत निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हिंदू राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे.

Web Title: All India Hindu Convention from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.