शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

माजी महापौरांच्या प्रभागाकडे सर्वपक्षीयांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या कॉमर्स कॉलेज या प्रभागाकडे आता सर्वपक्षीयांच्या नजरा लागल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेला ...

कोल्हापूर : माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या कॉमर्स कॉलेज या प्रभागाकडे आता सर्वपक्षीयांच्या नजरा लागल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेला आणि सर्वसमावेशक असलेला हा मतदारसंघ आता इतर मागाससाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांचीही संख्या अधिक आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या निलोफर आजरेकर या काँग्रेसच्या माध्यमातून महापौर झाल्यामुळे त्यांचे पती अश्कीन आजरेकर यांची उमेदवारी येथून निश्चित मानली जाते.

गेल्या निवडणुकीमध्ये निलोफर आजरेकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नव्हती. परंतु अपक्ष म्हणून रिंगणात उतरत त्यांनी बाजी मारली. त्यांनी ताराराणी आघाडीच्या गुलजारबी बागवान यांचा पराभव केला होता. सात उमेदवारांपैकी काँग्रेसचा उमेदवार त्यावेळी सहाव्या क्रमांकावर होत्या. परंतु आजरेकर यांनी महापालिकेत काँग्रेससोबत जात पालकमंत्री सतेज पाटील यांचा विश्वास संपादन केला आहे. महापालिका, पालकमंत्री पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यापासून भाजपचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्याकडूनही निधी आणून प्रभागात अनेक विकासकामे केली. अनेक वर्षे न सुटलेले, पाणी तुंबण्यासारखे प्रश्न मार्गी लावले. महापूर आणि कोरोनाच्या काळात मतदारसंघात व्यापक मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आता मतदारसंघ इतर मागाससाठी आरक्षित झाल्याने त्यांचे पती अश्कीन हे आता काँग्रेसचे उमेदवार असतील. या ठिकाणी भाजपच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष ऊर्फ आप्पा लाड हे भाजपकडून इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपला कायम संपर्क ठेवला आहे. ते रामानंदनगरमध्ये वास्तव्यास असले तरी, व्यवसायाच्या निमित्ताने ते लक्ष्मीपुरीत असतात. प्रभाग अध्यक्ष विशाल शिराळकर हे भाजपचे कार्यकर्तेही येथून इच्छुक आहेत. भोई गल्ली तालीम मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणारे स्वप्नील ठोंबरे हे देखील इच्छुक आहेत. दुर्गा दौड, शिवजयंतीच्या माध्यमातून कार्यरत असणारे ठोंबरे यांनी आपला पक्ष मात्र उघड केलेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. गेल्यावेळी ताराराणी आघाडीकडून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या गुलजारबी बागवान यांचे चिरंजीव रहीम हे देखील चाचपणी करत असून शिवसेनेकडून त्यांचे नाव चर्चेत आहे.

सर्वच पक्ष या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहेत. या प्रभागात जातीय आणि सामाजिक समीकरणांचा देखील प्रभाव राहणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून उमेदवारीबाबत विचार केला जाणार आहे. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर हे सुनेला महापौर केल्यानंतर आता चिरंजीवाला नगरसेवक करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणार, हे निश्चित आहे.

प्रभाग क्रमांक २६

कॉमर्स कॉलेज

विद्यमान नगरसेवक

निलोफर आजरेकर

आताचे आरक्षण

इतर मागास

गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...

निलोफर अश्कीन आजरेकर अपक्ष १५९५

गुलजारबी गुलाब बागवान ताराराणी १३७६

पूजा महेश भोर शिवसेना ४३९

लक्ष्मी दशरथ भोसले रासप ७४

गायत्री अमर माने काँग्रेस १४५

भाग्यरेखा रवींद्र पाटील राष्ट्रवादी ७०४

दीपाली कपिल यादव अपक्ष ३००

कोट

नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधा म्हणून जे जे करणे शक्य आहे ते केले आहे. भाजी मंडईपासून ते क्रीडा सुविधांपर्यंत, दोन महानगरपालिकांच्या शाळा, तीन समाजमंदिरे बांधली. केवळ महापालिकेच्या निधीवर अवलंबून न राहता राज्यसभेच्या खासदारांच्या निधीतूनही प्रभागाच्या विकासासाठी जोरदार काम केले आहे.

- निलोफर आजरेकर

माजी महापौर

ही झाली आहेत कामे...

लक्ष्मीपुरीतील भाजी मंडईचे बांधकाम. याच ठिकाणी ७० लाख रुपये खर्चून स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. येथील ड्रेनेज लाईन बदलण्यात आली. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. नेहमी पावसाळ्यात रिलायन्स मॉलच्या समोरील गल्ल्यांमध्ये साठणाऱ्या पाण्याचा निचरा केला. दोन व्यायामशाळांचे बांधकाम. सुसरबाग येेथे स्केटिंग मैदान. वॉकिंग ट्रॅक, ओपन जिमची उभारणी, एलईडी दिवे लावले. अशा पध्दतीने आठ कोटींपेक्षा अधिक रकमेची कामे केल्याचा दावा.

हे आहेत प्रश्न...

प्रभाग हा व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने त्यामध्ये शिस्त असण्याची गरज आहे. मात्र शिस्तीचाच येथे अभाव आहे. वाट्टेल तसे गाडे लावणे, वाट्टेल तेथे बाजारासाठी बसणे, अनैतिक व्यवसाय देखील या प्रभागात चालतात. त्याचा नागरिकांना त्रास होतो. याचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रचंड वाहतूक असलेल्या या प्रभागात या वाहतुकीलाही शिस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

(फोटो स्वतंत्र पाठवत आहे)