शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजेसाठी सर्व जातीचे पुजारी नेमले जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 16:23 IST

कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. 

कोल्हापूर : कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजा-यांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, त्या निर्णयाकडे पाठ फिरवत एकाही विद्यमान पुजा-याने पगारी नियुक्तीसाठी अर्ज केलेला नाही. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने पुजारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आलेल्या 117 अर्जांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे. या अर्जांच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया कशी राबवायची यासाठी बुधवारी (दि. 13) मुंबईत बैठक घेण्यात आली. दरम्यान, आज अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.श्री अंबाबाई मूर्तीला घागरा-चोली नेसवण्याच्या प्रकारानंतर कोल्हापुरात जनआंदोलन झाले आणि त्याची दखल घेत शासनाला मंदिरातील पारंपरिक पुजा-यांचे अधिकार संपुष्टात आणून पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करावा लागला. दि. २८ मार्चला दोन्ही सभागृहांनी त्यास मंजुरी दिली व दि. १२ एप्रिलला त्याचे गॅझेट झाले. मात्र, शासनाने अद्याप कायद्याची अधिसूचना (प्रसिद्धीकरण) दरम्यान, विधि व न्याय खात्याने देवस्थान समितीलाच स्वतंत्र समिती स्थापन करणे व पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार समितीकडे आजवर ११७ अर्ज आले असून त्यात ६ अर्ज महिला उमेदवारांचे आहेत.समितीने केलेल्या अभ्यासानुसार मंदिरात ११ प्रमुख पुजारी व ३५ सहाय्यक पुजारी अशा एकूण ५५ पुजारी व सेवेक-यांची आवश्यकता असल्यामुळे वरिष्ठतेनुसार मंगळवारपासून (दि. १९) तीन दिवस तीन टप्प्यात मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधीचा समावेश आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर