जयसिंगपूर : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावामधील छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी केली होती.राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या या प्रयत्नाला यश आले असून शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय व उद्योग सुरू करण्यास मुभा मिळणार आहे.
कोल्हापूर शहराबरोबराच ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सातत्याने बंद राहत असल्यामुळे हा सर्व व्यापारी वर्ग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेवून शुक्रवारपासून शासन नियमानुसार सर्व व्यवहार सुरु होणार आहेत.- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर,राज्यमंत्री