शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीची सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन, १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशन पूर्ण

By भीमगोंड देसाई | Updated: March 6, 2025 17:15 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व कागदपत्रे संबंधितांना https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. सध्या प्रमाणिकरणासाठी कार्यालयात जावे लागत आहे; मात्र कार्यालयातही जावे लागू नये, म्हणून नगर भूमी अभिलेखकडील सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही झाल्यानंतर तहसीलमधील रेकॉर्ड रूम आणि नगर भूमी अभिलेख कार्यालयातील नक्कल देण्यासाठीची दुकानदारी बंद होणार आहे.महसूलकडील आणि नगर भूमी अभिलेखकडील कागदपत्रे कार्यालयात जाऊन मिळवताना हेलपाटे मारावे लागतात. मागतील तितके पैसे द्यावे लागतात. प्रत्येक तहसीलमधील रेकॉर्ड रूम आणि भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी पैसे घेऊन नक्कल देणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यातून सुटका करून घेण्यासाठी या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करून त्यावर सही हवी असल्यास ती घेण्यासाठी कार्यालयात जावे लागत आहे. सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही झाल्यानंतर कार्यालयातही जाण्याची आवश्यकता नाही. शासनाचे ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर ते घरबसल्याही मिळवता येणार आहे. यामध्ये पारदर्शकता येणार आहे.

महसूलकडील डिजिटलायझेशन झालेल्या कागदपत्रांची संख्या आणि कंसात नगर भूमी अभिलेखकडील कागदपत्रांची संख्या अशी : कोल्हापूर शहर (१ लाख ९५ हजार), इचलकरंजी शहर (१ लाख ७ हजार), शाहूवाडी ११ लाख ११ हजार (१ लाख ७८ हजार), पन्हाळा १४ लाख (१ लाख ६६ हजार), हातकणंगले १८ लाख (१ लाख ४१ हजार), शिरोळ १० लाख (२ लाख ७३ हजार), गगनबावडा २ लाख (३७ हजार २१६ ), राधानगरी १२ लाख (२ लाख ४ हजार), कागल १४ (२ लाख), भुदरगड १२ लाख (१ लाख ७१ हजार ), आजरा ९ लाख (१ लाख ३० हजार), गडहिंग्लज १५ लाख ( २ लाख १० हजार).

ही कागदपत्रे डाऊनलोड कराटिप्पन बुक, गुणाकार बुक, आकारफोड पत्रक, आकार प्रपत्र, कमी जास्त पत्रक, आकार बंध, नऊ तीन नऊ चार, शेत पुस्तक, दुरूस्ती अभिलेख, एकत्रीकरण, जबाबधारिका, शेतपुस्तक, ताबा पावत्या, चौरस नोंद वही, मिळकत पत्रिका, वसलेवार पुस्तक, जुने सातबारा, आठ अ, फेरफार, नकाशा, चालू सातबारा आठ अ, सिटी सर्व्हेतील मालमत्ता पत्रक यासह शेत, घरासंंबंधीची सर्व कागदपत्रे.

नगर भूमी अभिलेखकडील सर्व कागदपत्रांचे डिजिटल सहीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नगरभूमापनकडील सर्व कागदपत्रे डिजिटल सहीचे ऑनलाईन मिळवता येतील. - शिवाजी भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी