अलका रानडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:02+5:302021-05-07T04:24:02+5:30
कोल्हापूर : देवकर पाणंद, निकम पार्कातील अलका गोविंद रानडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा ...

अलका रानडे यांचे निधन
कोल्हापूर : देवकर पाणंद, निकम पार्कातील अलका गोविंद रानडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
परशराम इळके
कोल्हापूर : कोरेनगर-मोरेवाडी (ता. करवीर) येथील परशराम गोविंद इळके (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
निरंजन उर्फ गणेश पाटील
कोल्हापूर : रंकाळा टाॅवर परिसरातील व मूळचे कणेरी, कोतोली) येथील निरंजन उर्फ गणेश प्रकाश पाटील (वय २९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, बहीण असा परिवार आहे.
पार्वती पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठ, उभा मारुती चौकातील पार्वती सदाशिव पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शोभा गिड्डे
कोल्हापूर : वांगी बोळातील शोभा गिड्डे (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे.
शामराव घाटगे
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाचे माजी अध्यक्ष व मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी परिसरातील शामराव गणपतराव घाटगे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकाश बाणकर
कोल्हापूर : लाईन बझार परिसरातील प्रकाश लक्ष्मण बाणकर (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
सुमन कांबळे
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, सिद्धार्थनगरातील सुमन सुखदेव कांबळे-नरवाडकर(वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अशुतोष अभ्यंकर
कोल्हापूर : जरगनगरातील प्रा.अशुतोष चिंतामणी अभ्यंकर(वय ४६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते खडकवासला येथील डीआयएटी येथे प्राध्यापक होते.