अक्षयच्या मैत्रिणीचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 00:47 IST2016-06-26T00:47:25+5:302016-06-26T00:47:25+5:30
युवती खून प्रकरण : दलालांची नावे रेकॉर्डवर येणार

अक्षयच्या मैत्रिणीचा शोध सुरू
कोल्हापूर : प्रेयसीच्या खूनप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला प्रियकर संशयित अक्षय किशोर शिंदे (वय २६, रा. शिवाजी पेठ) याच्या पायल नावाच्या मैत्रिणीचा करवीर पोलिस शोध घेत आहेत. तिच्या मध्यस्थीने मृत रूपा व संशयित अक्षय एकत्र आले होते. ती हाती लागल्यानंतर सेक्स रॅकेटमधील अनेक दलालांची नावे पोलिस रेकॉर्डवर येणार आहेत.
मृत रूपा व पायल ह्या दोघी वेश्या व्यवसाय करण्यासाठी तीन-चार वर्षांपासून कोल्हापुरात येत होत्या. दोघी मैत्रिणी असल्याने त्या कोठून आल्या, त्यांचे मूळ गाव कोणते याबाबतचा सर्व उलगडा होणार आहे. त्यासाठी पायल हाती लागणे पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सेक्स रॅकेटमधील दलालांची चौकशी सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)