आक्कासाहेब, इन्स्पेक्टर भोसले यांना भेटण्याची संधी

By Admin | Updated: February 27, 2015 00:19 IST2015-02-26T23:59:06+5:302015-02-27T00:19:28+5:30

खास वाचकांसाठी : ‘लोकमत’, ‘स्टार प्रवाह’ यांचा संयुक्त उपक्रम

Akkasaheb, the opportunity to meet Inspector Bhosale | आक्कासाहेब, इन्स्पेक्टर भोसले यांना भेटण्याची संधी

आक्कासाहेब, इन्स्पेक्टर भोसले यांना भेटण्याची संधी

कोल्हापूर : आपल्या आवडत्या मालिकेतील आवडत्या कलाकारांना भेटण्याची ओढ सर्वच रसिक प्रेक्षकांना असते. कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. ‘स्टार प्रवाह’ ही वाहिनी हीच अमूल्य संधी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेऊन आली आहे, ‘चैत्रचाहूल २०१५ : आपले स्टार आपल्या शहरात’ या उपक्रमाद्वारे.
तुमच्या सर्वांच्या आवडत्या आक्कासाहेब आणि तडफदार इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले कोल्हापुरातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता रंकाळा तलाव येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात या कलाकारांबरोबर गप्पा, धम्माल, मस्ती तर होणार आहेच; पण हे कलाकार प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर २१ मार्च २०१५ रोजी रात्री आठ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘चैत्रचाहूल २०१५’ या कार्यक्रमाचे स्वत: निमंत्रण देणार आहेत ‘चैत्रचाहूल २०१५ : आपले स्टार आपल्या शहरात’ या कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, सुप्रसिद्ध कोल्हापूर शहरातून होत आहे. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील आक्कासाहेब आणि ‘लक्ष्य’ मालिकेतील इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले या व्यक्तिरेखांवर कोल्हापूरवासीयांनी भरभरून प्रेम केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरमधील प्रेक्षकांना लाडक्या आक्कासाहेब आणि इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या कलाकारांबरोबर खास गप्पा तर रंगणार आहेतच; पण प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे फनी गेम्सही आयोजित करण्यात येणार आहेत.
या धम्माल कार्यक्रमासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. प्रवेश मर्यादित असून वाचकांनी नियोजित वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. ++


कार्यक्रमस्थळ : २८ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, रंकाळा तलाव, कोल्हापूर

Web Title: Akkasaheb, the opportunity to meet Inspector Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.