अक्कमहादेवी जयंती साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:36+5:302021-04-28T04:25:36+5:30
कोल्हापूर : ‘अक्कमहादेवी माता की जय’च्या जयघोषात मंगळवारी वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव महिला मंडळाच्या वतीने महायोगिनी अक्कमहादेवी जयंती ...

अक्कमहादेवी जयंती साधेपणाने
कोल्हापूर : ‘अक्कमहादेवी माता की जय’च्या जयघोषात मंगळवारी वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव महिला मंडळाच्या वतीने महायोगिनी अक्कमहादेवी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी कोरोनाचे संकट दूर कर, अशी प्रार्थना करण्यात आली.
बिंदू चौक येथील अक्कमहादेवी मंडपासमोरील मंदिरात पंचामृत अभिषेक, जन्मकाळ, पाळणा हे धार्मिक विधी गुरुदेव स्वामी व कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी आपापल्या घरीच हा जयंती उत्सव साजरा केला. यावेळी वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी कदम, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, सचिव राजू वाली, उमा गाताडे, मीना कोरी, इंदिरा श्रेष्ठी, चिनार गाताडे उपस्थित होते.
--
फोटो नं २७०४२०२१-कोल-अक्कमहादेवी जयंती
कोल्हापुरातील बिंदू चौक येथील अक्कमहादेवी मंडप येथे मंगळवारी वीरशैव लिंगायत समाजातर्फे अक्कमहादेवी जयंती साजरी करण्यात आली.
--