सकल मराठा समाजाच्या १६ जूनच्या मोर्चात आजरेकर सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:42+5:302021-06-09T04:29:42+5:30
आजरा : शिवराज्याभिषेकदिनी रायगडावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी १६ जून रोजी कोल्हापूर येथे मोर्चाचे ...

सकल मराठा समाजाच्या १६ जूनच्या मोर्चात आजरेकर सहभागी होणार
आजरा : शिवराज्याभिषेकदिनी रायगडावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी १६ जून रोजी कोल्हापूर येथे मोर्चाचे आयोजन केल्याचे जाहीर केले आहे. या मोर्चामध्ये आजरा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे होते.
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबरोबर इतर पाच मागण्यांची पूर्तता करण्याचे आवाहन राज्य व केंद्र सरकारला केले होते. ते पूर्ण केले नसल्यामुळे १६ जूनला कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी लाखोंच्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्याला अनुसरून आजरा तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर मराठा महासंघाचे सर्व प्रमुख मंडळी प्रत्येक गावात जाऊन मराठा आरक्षण व मोर्चाबाबत जनजागृती करणार आहेत.
बैठकीस तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, कार्याध्यक्ष संभाजी इंजल, सरचिटणीस प्रकाश देसाई, शिवाजीराव पाटील, दत्तात्रय मोहिते, शंकरराव शिंदे, शिवाजी गुडूळकर, गणपतराव डोंगरे, चंद्रकांत पारपोलकर, शिवाजीराव इंजल, सूर्यकांत नार्वेकर, महिलाध्यक्षा रचना होलम, गीता नाईक, मिनल इंजल, सुनंदा मोरे उपस्थित होते.