आजरा अर्बन बँक बिनविरोधचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:26+5:302021-01-08T05:20:26+5:30

कोल्हापूर : आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छाननीच्या दिवशी सोमवारी विरोधी इच्छुक तिघांचेही ...

Ajra Urban Bank paves the way for unopposed | आजरा अर्बन बँक बिनविरोधचा मार्ग मोकळा

आजरा अर्बन बँक बिनविरोधचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छाननीच्या दिवशी सोमवारी विरोधी इच्छुक तिघांचेही अर्ज बाद झाले आहेत. एकूण १० जणांचे अर्ज बाद झाले असले तरी यामध्ये सत्तारूढ गटाच्या ७ डमी अर्जांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

याआधी १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये नियोजित सत्तारूढ आघाडीव्यतिरिक्त केवळ तिघांनीनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये आदम पठाण, प्रवीण प्रभावळकर आणि प्रकाश डिसोझा अशी त्यांची नावे आहेत परंतु निवडणूक लढविण्यासाठी ठेव, भागसंख्या हे निकष पूर्ण होत नसल्याने या तिघांचेही अर्ज बाद ठरले आहेत. याबरोबरच सत्तारूढ गटाने भरलेले डमीपैकी ७ अर्ज छाननीत उडाले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

११ जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्यामुळे आता उर्वरित सत्तारूढ गटाने भरलेले डमी अर्ज मागे घेतले जाणार आहेत. त्यामुळे १८ जागांसाठी १८ अर्ज शिल्ल्क राहणार असून आता केवळ बिनविरोध निवड होणे ही औपचारिकता राहिली आहे. छाननीत अर्ज बाद होणे आणि शिल्लक उमेदवारांच्या नावांची अधिकृत यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अध्यक्षपद कुणाकडे

मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या नियमानुसार दिनांक १३ जानेवारीला दुपारी ३ वाजता आजरा हायस्कूलच्या मैदानावर बँकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सर्वसाधारण सभेत निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात येईल. याचवेळी चेअरमनपदाचीही निवडणूक होणार असून निवडणुकीनंतर चेअरमनपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर याबाबतही उत्सुकता आहे.

Web Title: Ajra Urban Bank paves the way for unopposed