आजरा तालुक्यात आज ७४ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:26 IST2021-04-28T04:26:16+5:302021-04-28T04:26:16+5:30

आजरा तालुक्यात आज ३७ महिला व ३७ पुरुष असे एकूण ७४ जण कोरोनाबाधित आढळले. आजच्या प्राप्त १७४ अहवालांपैकी १०० ...

In Ajra taluka today 74 people tested positive | आजरा तालुक्यात आज ७४ जण पॉझिटिव्ह

आजरा तालुक्यात आज ७४ जण पॉझिटिव्ह

आजरा तालुक्यात आज ३७ महिला व ३७ पुरुष असे एकूण ७४ जण कोरोनाबाधित आढळले. आजच्या प्राप्त १७४ अहवालांपैकी १०० जण निगेटिव्ह आहेत. उत्तुर व चव्हाणवाडी येथील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यात १ एप्रिलपासून १३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

गावनिहाय आज आढळलेले रुग्ण असे - भादवण १९, महागोंड १०, चव्हाणवाडी १३, आजरा ३, उत्तूर ४, किणे २, होन्याळी ४, वडकशिवाले २, कानोली २, पेरणोली ५, निंगुडगे २, सरोळी, मडिलगे, हाळोली, पोश्रातवाडी, बेलेवाडी, मेंढोली, शिरसंगी, वाटंगी येथे प्रत्येकी १ असे पुरुष ३७ व महिला ३७ असे एकूण ७४ जण बाधित सापडले आहेत.

Web Title: In Ajra taluka today 74 people tested positive