आजरा सूतगिरणी राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:49+5:302021-02-05T07:00:49+5:30
पेरणोली : कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या काळातही अण्णा-भाऊ सूतगिरणीने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून देशातही अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील आहे, ...

आजरा सूतगिरणी राज्यात अव्वल
पेरणोली : कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या काळातही अण्णा-भाऊ सूतगिरणीने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून देशातही अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अण्णा-भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले. मुंगूसवाडी (ता. आजरा) येथील सूतगिरणीच्या सभागृहात आयोजित ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी होत्या.
चराटी म्हणाल्या, संस्थेचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सूतगिरणीची घोडदौड सुरू आहे. गारमेंट व विविध प्रकल्पांमुळे यशस्वी वाटचाल सुरू आहे. यावेळी अर्बन बँकेचे नूतन अध्यक्ष सुरेश डांग, उपाध्यक्षा शैला टोपले, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, डॉ. दीपक सातोस्कर, मारुती मोरे, प्रकाश वाटवे आदी नूतन संचालकांचा सत्कार केला.
यावेळी आदर्श कामगार पुरस्कार लक्ष्मण भोसले यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, शंकर टोपले, सुधीर कुंभार, जी. एम. पाटील, अनिकेत चराटी, डॉ. इंद्रजित देसाई, डॉ. संदीप देशपांडे, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते.
कामगार अधिकारी सचिन सटाले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक रजनीकांत नाईक यांनी आभार मानले.