शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेडछाड, आजरा तीन दिवस बंद; येत्या शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 19:16 IST

सदाशिव मोरे आजरा : अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आजऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन दिवस आजरा बंद व शुक्रवार दिनांक ६ ...

सदाशिव मोरेआजरा : अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आजऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन दिवस आजरा बंद व शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आज तहसिल कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बंद मागे घेवून शुक्रवारी ९ ते ११  यावेळेत जनआक्रोश मोर्चा काढून त्यानंतर आठवडा बाजार पूर्ववत सुरू करण्याचे ठरले होते. परंतू हा निर्णय अमान्य करीत हिंदुत्ववादी कार्यकर्ते तीन दिवसाचा बंद, जनआक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम राहिले. यासर्व परिस्थितीमुळे आजरा शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.रात्रीच्या सुमारास  शहरातील एका हायस्कूलमधील स्नेहसंमेलनानिमित्त आयोजीत सांस्कृतिक कार्यक्रम पाहून अल्पवयीन मुलगी आपल्या पालक व मैत्रिणी सोबत घरी जात होती. दरम्यान काही तरुणांनी या मुलीची छेड काढली. ही घटना वाऱ्यासारखी आजरा शहरात पसरली. व वातावरण तणावपूर्ण बनले. संबंधित तरुणाला पकडून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलिस स्टेशनच्या दारात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री गर्दी केली होती. दरम्यान, तीन दिवस आजरा बंद व शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा काढण्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे आज दिवसभर आजरा शहरात तणावपुर्ण शांतता होती. बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर आजरा पोलिसांनी शहरातून संचलन करीत शांतता कमिटीची बैठक घेतली. मात्र यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याने यावर तोडगा निघाला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी