आजरा मर्चंट क्रेडिट सोसायटीला २५ लाखांचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:05+5:302021-09-09T04:29:05+5:30
संस्थेकडे ११ कोटी १३ लाख ६३ हजारांच्या ठेवी असून ७ कोटी ६६ लाख १९ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. ...

आजरा मर्चंट क्रेडिट सोसायटीला २५ लाखांचा निव्वळ नफा
संस्थेकडे ११ कोटी १३ लाख ६३ हजारांच्या ठेवी असून ७ कोटी ६६ लाख १९ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेला २५ लाख ६ हजार ९८४ रुपयांचा नफा झाला असून तरतुदीनंतर १० लाख ३१ हजार ९८४ रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा संचालक मंडळाने मानस केला आहे, अशी माहिती प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष रमेश कारेकर यांनी दिली.
स्वागत संस्थेचे संचालक दिवाकर नलवडे यांनी केले. श्रद्धांजलीचा ठराव संचालक रुद्राप्पा पाटील यांनी मांडला. नफा-तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व अंदाजपत्रकाचे वाचन संस्थेचे कर्मचारी अनिल पाटील यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन मॅनेजर गोपाळ पाटील यांनी केले. सभेला उपाध्यक्ष सूरज जाधव, संचालक बसवराज गुंजाटी, शिवलिंगाप्पा तेरणी, गोपाळ पाटील, श्यामराव कारंडे, मारुती वाजंत्री, उमा हुक्केरी, स्मिता टोपले उपस्थित होते.
सभेला ऑनलाईन हजेरी लावलेल्या सभासदांचे आभार संचालक गोपाळ जाधव यांनी मानले.
फोटो ओळी :
आजरा मर्चंटच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष रमेश कारेकर, शेजारी संचालक मंडळ.
क्रमांक : ०८०९२०२१-गड-०६