शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:05 IST

जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपा आध्यात्मिक आघाडीच्यावतीने तर अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तर भाजपने राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करत तीव्र निषेध केला. यातच आता यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.संभाजीराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले हे कोणी नाकारु शकत नाही. म्हणून संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेतच तर धर्मरक्षक देखील आहेत असे म्हणणे चुकीचे होणार नाही. अजित पवारांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. याबाबत अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ घेवून हे विधान केले हे त्यांनीच सांगावे. कोणतीही एतिहासिक घटना बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पुर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देवू नये अशी अजित पवारांना माझी सूचना राहिल असेही ते म्हणाले. अजित पवार जे बोले ते अर्ध सत्य बोलले. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अस जे विधान केले ते पुर्णपणे चुकीचे असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.काय म्हणाले होते अजित पवारविधानसभेत बोलताना पवार म्हणाले, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAjit Pawarअजित पवार