पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्य रेडेकरची बाजी
By Admin | Updated: April 3, 2015 00:39 IST2015-04-03T00:33:47+5:302015-04-03T00:39:05+5:30
निकम, घोलप यांचेही यश : ‘कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी’तर्फे आयोजन

पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्य रेडेकरची बाजी
कोल्हापूर : ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत अजिंक्य रेडेकर, मनोज कुंभार, किसन पालसांडे, बाजीराव घोलप, प्रवीण निकम यांनी प्रथम क्रमांक पटकावले. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते : ६० किलोगट बाजीराव घोलप (सातारा), ६५ किलोगट - मनोज कुंभार (सांगली), ७० किलोगट - किसन पालसांडे (सोलापूर), ७५ किलोगट - अजिंक्य रेडेकर (कोल्हापूर), ७५ किलोवरील गट - प्रवीण निकम यांनी प्रथम क्रमांक पटकावले. कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन पाटील व मित्र परिवारातर्फे येथील सायबर चौक येथे या स्पर्धेचे संयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. कोणाच्याही मदतीशिवाय भरविलेल्या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रा. जयंत पाटील, स्थायी समिती सभापती आदिल फरास, नगरसेवक राजू लाटकर, बी. के. सावंत, बिभीषण पाटील, रामकृष्ण चितळे, रवींद्र आरते, सुहास व्हटकर, एस. डी. पाटील, शानूर मुजावर, अमोल कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)