शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘मी ओके म्हणालो अन् काही मिनिटांतच विमान गायब’; कोल्हापुरातील वायुसैनिक मुरलीधर देसाई यांनी जागवल्या आठवणी

By पोपट केशव पवार | Updated: October 3, 2024 11:49 IST

५६ वर्षांपूर्वी घडलेल्या या अपघातात एकही जण वाचला नाही

पोपट पवारकोल्हापूर : दिवस ७ फेब्रुवारी १९६८... स्थळ चंदीगड विमानतळ..दुपारी १२:५० ला ९८ सैनिक व ५ क्रू मेंबर असलेल्या एका विमानाने लेहला जाण्यासाठी उड्डाण केले. या विमानाला कोल्हापुरातील २६ वर्षांचा एक तरुण वायुसैनिक रेडिओ टेलिफोन ऑपरेटर म्हणून कंट्रोल रूममधून सूचना देत होता. त्याच्या नियंत्रण कक्षापर्यंत हे विमान सुरक्षित मार्गक्रमण करत होते. मात्र, त्या कक्षाबाहेर जाताच काही मिनिटांमध्येच ते कोसळले अन् होत्याचं नव्हतं झालं.५६ वर्षांपूर्वी घडलेल्या या अपघातात एकही जण वाचला नाही; पण जे गेले त्यातीलही ९८ जण अजूनही सापडले नसल्याने या विमान प्रवासाचा साक्षीदार राहिलेला तो २६ वर्षांचा वायुसैनिक मुरलीधर देसाई आज वयाच्या ८१ व्या वर्षीही या कटू आठवणींनी गहिवरतात. चंदीगड-लेह या विमान अपघातातील चार जणांचे मृतदेह शोधण्यात लष्कराला मंगळवारी यश आले. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना पाच दशकांपूर्वीच्या आठवणी जाग्या केल्या.कोल्हापुरातील मुरलीधर देसाई हे १९६३ मध्ये वायुसेनेत दाखल झाले. पुढे त्यांची चंदीगड येथे रेडिओ टेलिफोन ऑपरेटर म्हणून बदली झाली. चंदीगड-लेह या विमानाच्या पायलटला सूचना देण्याचे काम ते करत होते. ते म्हणाले, त्या दिवशी वायुसेनेच्या विमानातून ९८ सैनिक व ५ क्रू मेंबर लेहला जाण्यासाठी दुपारी १२:५० वाजता निघाले. हे विमान दुपारी १:४० ला लेहला पोहोचणार होते. हे विमान माझ्या नियंत्रण कक्षात होते तोपर्यंत हवामान, विमानाची उंची याबाबत मी पायलटला सूचनाही दिल्या. मात्र, माझ्या नियंत्रण कक्षाच्या बाहेर विमान जाताच मी ओके म्हणालो अन् काही मिनिटांतच ते कोसळले.

बिघाड, अडचणीबाबत काहीच सांगितले नाहीमाझ्या नियंत्रण कक्षाबाहेर विमान जाताच लेह विमानतळावरील ऑपरेटर पायलटला सूचना देत होता. त्यांचे संभाषण मी लिहून घेत होतो. मात्र, विमानात काही बिघाड, अडचण याबाबत पायलटने काहीच सांगितले नसल्याचा दावा देसाई यांनी केला. या अपघातातील सर्व सैनिकांचे मृतदेह केंद्र सरकारने शोधून काढणे गरजेचे आहे, असेही देसाई म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानAccidentअपघात